Rupees 2 Lakh Demand Draft To Uddhav Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आज त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी 2 लाखांचा डिमांड ड्राफ दिला जाणार आहे. ठाकरेंना हा डिमांड ड्राफ डॉक्टर मोहन चव्हाण देणार आहेत. ठाकरेंची भेट घेण्यासाठी मोहन चव्हाण यांनी वेळ मागितली होती आणि त्यांना 18 सप्टेंबरची सांयकाळची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान मोहन चव्हाण न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठाकरेंना 2 लाखांचा डीडी देणार आहेत. मात्र हा डीडी न्यायालयाने ठाकरेंना का द्यायला सांगितला आहे? नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात...


नेमकं हे प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीला मानणाऱ्या बंजारा समाजाच्या भावना उद्धव ठाकरेंनी दुखावल्याचा दावा डॉ. मोहन चव्हाण यांनी केला होता. पोहरादेवी येथील महंत उध्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री' या निवासस्थानी आले होते तेव्हा त्यांनी पोहरादेवीचा प्रसाद आणि विभूती आणली होती. मात्र हा प्रसाद आणि विभूती उद्धव ठाकरेंनी नाकारल्याचा दावा करत डॉ. मोहन चव्हाण यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. ठाकरेंनी आपल्या कृतीमधून बांजारा समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा करत डॉ. मोहन चव्हाण यांनी न्यायालयात याचिकाच दाखल केली होती.


उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाचा अपमान करत मुद्दाम पोहरादेवीचा प्रसाद खाल्ला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने डॉ. मोहन चव्हाण यांच्या विरोधात निकाल दिला. डॉ. मोहन चव्हाण यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. 29 ऑगस्ट रोजी यासंदर्भात आदेश न्यायालयाने दिला होता.


नक्की वाचा >> ₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, 'तुम्ही कार..'


आज मागितली भेटीची वेळ


न्यायालयाने केवळ विरोधात निकाल दिला असं नाही तर डॉ. मोहन चव्हाण यांना न्यायालयाने 2 लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाच्या रक्कमेचे दोन लाख रुपये उद्धव ठाकरे यांना देण्याचे आदेश न्यायालयाने डॉ. मोहन चव्हाण यांना दिले होते. डॉ. मोहन चव्हाण यांनी दाखल केलेल्या उद्धव ठाकरेंविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना औरंगाबादमधील खंडपीठाने दोन लाखांचा डीडी 'मातोश्री'वर नेऊन द्या, असा आदेश दिला होता. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला म्हणून न्यायालयाने चव्हाण यांना हा मोठा दंड न्यायालयाने ठोठावला.


नक्की वाचा >> Vidhan Sabha: अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेचा बिनशर्त पाठिंबा? राऊत म्हणाले, 'राज कधीही..'


डॉ. मोहन चव्हाण यांनी ठाकरेंच्या भेटीसाठी 18 सप्टेंबरची वेळ मागितली असून ही वेळ त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळेच ते आजच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना हा 2 लाखांचा डीडी देणार आहेत. मोहन चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंबरोबरच आणि पोलिसांशी पत्रव्यवहार करून भेटण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांना वेळ दिल्याने आज ही भेट होणार आहे.