मुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा
महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रागयगड दौरा.
दीपक भातुसे / मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यात "निसर्ग" चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी करणार आहेत. त्यांच्या जिल्हा दौऱ्याचे नियोजनही करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर जात असल्याची अधिकृत माहीती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली.
मुख्यमंत्री आज नुकसानीची पाहणी करणार
मुख्यमंत्री ठाकरे दुपारी अलिबाग तालुक्यातील थळ गावात चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी करणार आहेत. त्यानंतर ते अलिबागमधील प्रसुद्ध चुंबकिय वेधशाळेची चक्रीवादळाने केलेल्या नुकसानी पाहाणी करणार आहेत. चक्रिवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी झाल्यावर मुख्यमंत्री ठाकरे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चक्रीवादळाने झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यात वादळाने केलेल्या नुकसानीबद्दल स्थानिक नुकसानग्रस्त रहिवाश्यांसाठी विशेष आर्थिक पँकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनीही कोकणसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या दौऱ्यात काय घोषणा करतात, याचीच उत्सुकता आहे.