तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेल्या सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा वाहू लागला आहे. पावसाळ्यामुळे तब्बल १५०० फुटावरून कोसळणारा हा ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी भेट देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरवागार निसर्ग...काही किलोमीटरचा घाट रस्ता...१५०० फूट उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र फेसळणारे पाणी... आणि दुरुनच आवाजाने आपल्या अस्तित्वाची जाण करु देणारा ठोसेघरचा धबधबा...सातारा शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा पर्यटनचा केंद्र बिंदू ठरतो आहे. 


ग्रामस्थ आणि वनविभागाच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकही खुश आहेत.


या धबधब्याच्या ठिकाणी जाताना निसर्गाचा शक्तीचा अनुभव प्रत्येकालाच येतो. या शक्तीशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्याचा फटकाही बसला आहे. त्यामुळे इथल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी एकदा तरी नक्की या...पण फाजील धाडस मात्र करु नका.