विकास भोसले, झी मीडिया,सातारा : साता-यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातुन पर्यटक गर्दी करु लागले आहेत. हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळतायेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना पर्यटक बेधुंद होतोय...संततधार पावसानं साताऱ्यापासून 25 किलोमीटवरचा ठोसेघर धबधबा मनमुराद कोसळायला सुरूवात झालीय. शेकडो पर्यटक ठोसेघरला भेट देतायातय...


हिरवाईचा शालू पांघरलेली धरती पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.. रंगबेरंगी रानफुले लक्ष वेधून घेत आहेत. गवताच्या पात्यांवर विसावलेले पाण्याचे थेंब मोत्यासमान दिसत आहेत. पर्यटक त्याचा आनंद उपभोगतायत. डोंगरदऱ्या खळखळणाऱ्या छोट्या धबधब्यांमध्ये पर्यटक आनंद लुटत आहेत.


रोजच्या जीवनातला कोलाहल बाजूला ठेवून ठोसेघरला आलेला पर्यटक निसर्गाचं विलोभीन रुप घेऊन परत जातो तेव्हा त्याला नवी उभारी मिळालेली असते...अगदी हुबेहुब ठोसेघरच्या धबधब्यासारखी सतत ओसंडून वाहणारी...आनंद देणारी.