नाशिकमध्ये कोरोनारूग्ण हजारापार
सर्वाधिक संख्या शहरात, येणारा आठवडा ठरणार धोकेदायक
नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसून येतोय. सहा महिन्यात प्रथमच कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १ हजार १०३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच शनिवारी संध्याकाळी मिळालेल्या अहवालात स्पष्ट झाल आहे. हा आकडा गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक जास्त मानला जातोय. आज रोजी (८/१/२०२२) जिल्ह्यात एकूण ३ हजार ५५० रुग्ण उपचार घेत आहे.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे नाशिक जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाशिक शहरात हे प्रमाण सर्वाधिक असून ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी दिसून येतेय.
शहरी आणि ग्रामीण भागात नवीन वर्ष्याच्या सुरवाती पासूनच कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत मोठा फरक दिसून येतोय. शहराची रुग्ण संख्या हि ग्रामीण पेक्षा चार पटीने वाढताना दिसून येत आहे. गेली चोवीस तासाच्या आकडेवारीत शहरी भागात ८५७ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत तर ग्रामीण भागात २०१ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत.
आठ दिवसात नाशिक शहर आणि ग्रामीण भागात झालेली वाढ
दिनांक शहरी रुग्ण ग्रामीण रुग्ण एकूण रुग्ण
संख्या संख्या संख्या
१/१/२०२२ ८८ ३२ १२२
२/१/२०२२ ७१ ३६ ११७
३/१/२०२२ १५१ ३६ २१६
४/१/२०२२ ३२ ०२ २७६
५/१/२०२२ ४१३ ७७ ५०८
६/१/२०२२ ४१९ ८७ ५३८
७/१/२०२२ ६२२ १७३ ८३७
८/१/२०२२ ८५७ २०१ ११०३
पहिल्या लाटेत हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव मध्ये मात्र रुग्ण संख्या किरकोळ दिसून येतेय. मालेगावमध्ये दुहेरी आकडा सुद्धा पार केलेला दिसून येत नाही. आज रोजी मालेगावमध्ये फक्त ६ रुग्ण कोरोना बाधित मिळून आले आहेत.
आजवर जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ३०९ रुग्ण कोरोनां मुक्त झाले असून सद्यस्थितीत २ हजार ५६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आकडेवारी बघता बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के इतके आहे.
सध्या वाढत असलेली रुग्ण संख्या हि तीसरी लाट असल्याच म्हटलं जात आहे. रुग्ण वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. मात्र गरज आहे नागरिकांनी गर्दी टाळण्याची आणि त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याची.