मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP Chief) शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकीचा फोन (Threat Call) आल्याची बातमी काही वेळेपूर्वी पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये असा धमकीचा फोन आल्याचं म्हटलं जात होतं. पण या बातमीचं खुद्द शरद पवार यांनीच खंडन केले आहे. (Sharad Pawar Denied threatening phone calls)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस (Mumbai Police) कंट्रोल रूमकडे धमकीचा फोन आल्याची बातमी होती. पण मुंबई पोलिसांनी देखील हे वृत्त फेटाळले आहे. शरद पवार (Sharad Pawar ) यांना धमकीचा फोन आल्याची बातमी व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पण नंतर शरद पवारांनीच याचं खंडन केलं आहे. 


शरद पवार सोलापूरच्या कुर्डुवाडीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी येथे पत्रकार परिषद देखील घेतली. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. त्यावर देखील यावेळी शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.


शरद पवार म्हणाले की, राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला कुणी विरोध करत नाही. गेल्या 40 वर्षापासून बाळासाहेबांची आणी आता उद्धव साहेब यांची शिवसेना आहे. शिंदे साहेब यांनाही मेळावा घ्यायचा अधिकार आहे. पालकमंत्री नेमणूकीला विलंब करणे योग्य नाही. असं देखील ते म्हणाले.