मिलिंद एकबोटे यांना जीवे मारण्याची धमकी
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अटकेत असणाऱ्या मिलिंद एकबोटे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अटकेत असणाऱ्या मिलिंद एकबोटे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकबोटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना ठार करण्याची धमकी एका निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. संपूर्ण एकबोटे कुटुंबाला तोफेच्या तोंडी देऊन त्यांचं एन्काऊंटर करा, असं या निनावी पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याबाबत मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसंच पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.