पनवेल : नवी मुंबईच्या पनवेलमधल्या खारघर सेक्टर ३० इथल्या कॅनरा बँकेत, चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. १४ सप्टेंबरच्या रात्री तिघा चोरांचा चोरीचा हा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टोळक्यातले दोघे जण बँकेबाहेर थांबले होते. तर एकानं बँकेचं शटर तोडून आतमध्ये शिरकाव केला. मात्र त्याला लॉकर उघडता आले नाहीत. अखेर हे चोर बँकेतल्या सीसीटीव्हीची डीव्हीआर घेऊन पसार झाले.


खारघर पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून, त्यांना १८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिघेही २० ते २२ वर्ष वयोगटातले आहेत.