नाशिक : कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी दूध काढण्यासाठी जनार्दन, त्यांची पत्नी विमल आणि पुतण्या या गोठ्यात गेले. त्याच वेळी अतिवृष्टीमुळे हा गोठा कोसळला. या दुर्घटनेत दोघं सुखरुप बाहेर पडले. मात्र जनार्दन यांच्या पत्नी गंभीर जखमी झाली.


ग्रामस्थांनी तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलंय. या दु्र्घटनेत तीन म्हशींचा करुण अंत झालाय. जेसीबीच्या साहाय्याने या मृत म्हशींना बाहेर काढण्यात आलंय. या दुर्घटनेत दोन मोटार सायकल आणि जुन्या कारचंही नुकसान झालंय.