Coronavirus : तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू तर महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा वाढला
Coronavirus in Maharashtra : देशात कोरोनाचे 1300 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर महाराष्ट्रात सर्वात 159 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत.
Coronavirus in Maharashtra : गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1300 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर महाराष्ट्रात सर्वात 159 रुग्ण सापडले आहेत. तर कोरोनाने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. तर गुजरातमध्ये 148 रुग्ण आढळले आहेत. देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढलीय.
बुधवारी देशभरात कोरोनाच्या 1 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून 7 हजार झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यात कोरोनासह एच 1 एन 1 आणि एच 3 एन 2 या विषाणूंमुळे आलेल्या तापाच्या साथीचाही आढावा घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना अजून गेलेला नाही, मास्क वापरा
केंद्रीय आरोग्य बैठकीच्यावेळी कोरोना अजून गेलेला नाही, मास्क वापरा, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, कोरोना पसरवू देऊ नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांनी काही सूचना केल्या आहेत. यात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, साथ पसरु नये म्हणून यासाठी योग्य काळजी घ्या, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे मास्क वापरा, सर्व श्वसनरोगांच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळा सज्ज ठेवा आणि चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत सतर्क राहा. तसेच कोरोना लसीकरणावर भर द्या, असे सांगण्यात आले आहे.
आकडेवारीनुसार, देशात संसर्गाचा दैनंदिन दर 1.46 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, साप्ताहिक दर 1.08 टक्क्यांवर गेला आहे. सध्या देशात कोरोनाचे 7605 रुग्ण उपचार घेत आहेत, जे एकूण रुग्णांपैकी 0.02 टक्के आहे.
कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.79 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 4,41,60,997 कोरोना रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना लसीचे 220.65 कोटी डोस लोकांना देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 7,530 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.