राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक चिंता करणारी बातमी हाती आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची (Rain) शक्यता आहे.
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक चिंता करणारी बातमी हाती आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची (Rain) शक्यता आहे. गुरुवारपासून तीन दिवस पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), विदर्भ ( Vidarbha), मराठवाड्यात ( Marathwada) पावसाची शक्यता आहे. तर कोकणातही (Konkan) पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पश्चिमी चक्रीवादळामुळे राज्यांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीपुढेच आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्याचवेळी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वाऱ्याच्या आंतर क्रियेच्या प्रभावाखाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मेघ गरजेनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीत 17 ते 19 मार्च दरम्यान वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, दिल्ली आणि एनसीआरच्या बर्याच भागात 9 मार्चपासून कोरड्या हवामानाला ब्रेक लागला आहे. काही ठिकाणी गडगडाटासह वादळी पाऊस झाला. त्यानंतर 11 आणि 12 मार्च रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात बदल दिसून आला. काही ठिकाणी मध्यम आणि हलका पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली.
पश्चिमी वाऱ्यामुळे हा पाऊस झाल्याचे भारतीय हवामाना खात्याने म्हटले आहे. आकाश 21 आणि 23 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज आहे. तसेच काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारताच्या पश्चिमी भागातील राजस्थानमध्ये चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी 18 आणि 19 मार्च रोजी ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस 21 ते 23 मार्च दरम्यान व्यापक रुप घेण्याची शक्यता आहे.
यापूर्वी राजधानी दिल्ली व त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये दिवसा-रात्री तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होते. तथापि, पुढच्या आठवड्यात पावसाची शक्यता असून हा गडगडाटासह पाऊस पडेल. तर काही भागात गारपिटीमुळे तापमानात पुन्हा चांगली घसरण होईल, असा अंदाज आहे.