पुणे : जिल्ह्यातील दौंडमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू झाल्याची घडना घडलेय. एकाच व्यक्तीकडून दोन ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरावडेनगर, नगर चौकी भागात गोळीबाराची ही घटना घडली. या गोळीबारानंतर दौंडमधील तणाव वाढलाय. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि अनिल जाधव या तिघांचा गोळीबारात मृत्यू झालाय. गोळीबार करुन संजय शिंदे घरी जाऊन लपून बसला आहे. त्याच्या घराबाहेर मोठा जमाव जमला आहे.


संजय शिंदे हा एसआरपीचा जवान असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हा गोळीबार का करण्यात आला, याची अधिक माहिती मिळालेली नाही.