Acharya Vidyasagar Maharaj :  जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज (Acharya Vidyasagar Maharaj)  यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.  शनिवारी रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी त्यांचे निर्वाण झाले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांनी अकेरचा श्वास घेतलाय. आचार्य विद्यासागर महाराज यांच्या निर्वाणामुळे जैन धर्मीयांमध्ये शोककळा पसरली आहे. आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अत्यंदर्शनाला जाताना तीन अनुयायांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया येथे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.  


कार कालव्यात कोसळली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंत्य दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा गोंदियाच्या सालेकसा जवळील पानगाव येथे भीषण अपघात झाला. यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे भाविक जखमी झाले आहेक. जखमींवर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगड कडे हे भाविक संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शन ला निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे त्याची कार अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये कोसळली.  कालव्यामध्ये मध्ये पाणी असल्याने पाण्यात बुडून या तिन्ही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान 


जैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज हे  जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान आहेत. आचार्य विद्यासागर महाराज हे तपस्वी साधू होते. ते दीर्घकाळ ध्यानधारणा करायचे.  दार्शनिक साधू म्हणून जैन धर्मिय त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आचार्य विद्यासागर यांना  आदरांजली वाहिली. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


वयाच्या 26 व्या वर्षी बनले आचार्य


आचार्य विद्यासागर महाराजांचे मुळगांव कर्नाटकच्या बेळगावमधील चीकोडमधील सदलगा आहे. तर, त्यांचे याचं मूळ नाव विद्याधर असे आहे. दीक्षेनंतर त्यांचं नामकरण आचार्य विद्यासागर असे झाले. आचार्य विद्यासागर यांनी 1966 मध्ये जैन मुनी आचार्य देशभूषण महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत घेतलं होतं. 30 जून 1968 मध्ये आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी विद्यासागर महाराज यांना वयाच्या 20 वर्षी  मुनी दीक्षा दिली. 22 नोव्हेंबर 1972 रोजी वयाच्या अवघ्या 26 वर्षी विद्यासागर महाराज  यांना आचार्य पद देण्यात आलं.  मुलींच्या शिक्षणासाठी संस्था आश्रम तसेच गो शाळा  आचार्य विद्यासागर यांनी सुरु केल्या. विद्यासागर महाराज यांनी देशभरात पद यात्रा काढून समाजाचा प्रसार आणि प्रचार केला.