रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना वाचवण्यात यश मिळालय. हे तिघेही पुण्यातील दौंड तालुक्यातील पिंपळेगावाचे रहिवासी आहेत. पूजा कापरे, नंदकुमार कापरे आणि प्रदिप कापरे अशी या तिघांची नावं आहेत. देवदर्शनासाठी हे कुटुंब गणपतीपुळ्यात आले होते. देवदर्शन करुन ते समुद्रात पोहण्यासाठी समुद्रात गेले होते. मात्र समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात आत खोल पाण्यात खेचले गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, किनाऱ्यावर असणाऱ्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने हालचाली करत जवळच्या व्यावसायिकांच्या मदतीने या तिघांना वाचवलं. 


सध्या पावसाळा सुरु आहे आणि समुद्र खवळलेला असताना पर्यटक सुचनांचं पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना होतात. त्यासाठी पर्यटकांनीदेखील काळजी घ्यायला हवी.