Maharashtra Mahamarg News In Marathi: महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाचे जाळे विकसित झाले आहे. राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. तसेच काही महामार्गांचे काम देखील येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. तर दुसरीकडे राज्यात समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाची उभारणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे  625 किलोमीटर लांबीच्या  काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. तसेच उर्वरित 76 किमी लांबीचे काम जुलै 2024 पर्यंत पूर्ण केले जाईल. म्हणजेच जुलै महिन्यापासून समृद्धी महामार्गावरून नागपूर ते मुंबई असा पूर्णपणे प्रवास करणे शक्य होणार आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात आणखी काही नवीन महामार्गाची उभारणी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहे. येत्या काही वर्षात राज्यात 3 नवीन महामार्गाची निर्मती होणार असून यामध्ये पुणे रिंग रोड, विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आणि समृद्धी महामार्गचा विस्तारित मार्ग म्हणजेच जालना-नांदेड समृद्धी महामार्ग विकसित करण्यात येणार आहे.


विशेष महामार्गाच्या कामांसाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. या तिन्ही प्रकल्पांच्या कामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या होत्या. या तिन्ही प्रकल्पांचे काम 26 पॅकेजमध्ये होणार असून त्यासाठी 82 निविदा भरण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. एकूण 19 कंपन्या पात्र ठरल्या. दरम्यान, याच तीन प्रकल्पांसाठी 19 कंपन्यांनी 82 निविदा सादर केल्या आहेत. गुरुवारी विशेष तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. एका पॅकेजच्या कामासाठी तीन ते पाच कंपन्यांनी निविदा दिल्या आहेत.


असे असतील तीन नवीन महामार्ग


विरार-अलिबाग महामार्ग – हा महामार्ग 128 किलोमीटर लांबीचा विकसित होणार आहे. विरार-अलिबाग महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 96 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 8 वरील नवघर ते पेण आणि राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बलावली गावाचा समावेश आहे. एकूण 11 पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम केले जाईल. अंदाजे 60 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.


पुणे रिंगरोड – पुणे रिंगरोड हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. हा रिंग रोड 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंद आहे. या रिंगरोड प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीची समस्या होणार आहे. पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 136 किलोमीटर लांबीचे काम केले जाणार आहे. हे काम 9 पॅकेजमध्ये केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 16 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


जालना-नांदेड समृद्धी महामार्ग – जालना ते नांदेड महामार्ग 190 किमी लांबीचा आहे. या समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत होईल. तसेच हा महामार्ग मराठवाड्यातील तील विकासामार्फतच चालविला जाणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जालना-नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम एकूण 6 पॅकेजमध्ये पूर्ण केले जाणार आहे. जालना-नांदेड रस्ता पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचे स्वागत होणार आहे.