सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता सोलापूरमध्ये झाली. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहदेखील उपस्थित होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यामध्ये जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्याच्या माण-खटावमधून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. पण त्यांनी ३० ऑगस्टरोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. राणा जगजित सिंग हे कळंब उस्मानाबाद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राणा जगजित सिंग हे मुंबईमध्ये त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. तर कोल्हापूरमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले धनंजय महाडिक यांनीही हातात भाजपचा झेंडा घेतला.


भाजपमध्ये याआधी झालेल्या मेगा भरतीत पिचड पिता-पुत्र, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी देखील भाजपची वाट धरली होती.