पुणे : पुणे जिल्ह्यातील कापूरवळ दीवळे गाव परिसरात ३ बिबटे मृत अवस्थेत सापडलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


या मृत बिबट्यांमध्ये दोन नर आणि एक मादी आहे. विशेष म्हणजे या दिवळे गावाच्या परिसरात ३० ते ४० कावळेही मरण पावले आहेत. वनविभागाची टीम याठिकाणी दाखल झाली असून कशामुळे मृत्यू झाला याची तपासणी करत आहेत. घटनास्थळी एक विशेष पथकही येणार आहे.