अवैध गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरासह तीन जणांना अटक
अवैध गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे.
अकोला : अवैध गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे. अवैध गर्भपात करणाऱ्या अकोला शहरातील शिवणी परिसरातील डॉ. रोशनी गावंडे यांच्या दवाखान्यावर पोलीस आणि महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अन्न व औषध विभागाच्या पथकानी संयुक्त कारवाई करत धाड टाकली. या कारवाईत महिला डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली.
डॉ. रोशनी गावंडे यांच्या 'सात्विक क्लिनिक' नामक दवाखान्यावर धापा मारण्यात आला. या दवाखान्यात अवैध गर्भपात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. महत्वाची बाब म्हणजे ही महिला डॉक्टर बीएचएमएस आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरसह तीन जणांना अटक केली आहे.
गर्भपात करण्याच्या औषधीचा साठा आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी दिली. या दवाखान्यात अवैध गर्भपात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.