रायगड : साखरपुड्याची माणसे घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पोलादपूर तालुक्यातील मोरसडे जवळ रात्री ९.१५ वाजता ही घटना घडली. टेम्पो ५०  फूट दरीत कोसळला. अपघाताच्यावेळी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १६ जण जखमी झालेत. दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तविण्यात आलेय.


मृतांची नावे


१. भिकू तुकाराम मालुसरे


२. पांडुरंग धोंडू बीरमणे


३. अनिकेत अनंत सकपाळ