Igantpuri Car Accident: दुचाकीवर टांगा स्वार.. घरी जाताना तिघांवर काळानं घातली झडप
Igatpuri Car Accident: सध्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसते की अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडे (Shocking News) खळबळ माजवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर गाडी चालवताना प्रवाश्यांनी काळजी घेणे आवश्यक ठरले आहे.
Igatpuri Car Accident: सध्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसते की अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडे (Shocking News) खळबळ माजवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर गाडी चालवताना प्रवाश्यांनी काळजी घेणे आवश्यक ठरले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या कारचा इगतपुरी (Igatpuri Accident) नजीक एक भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन लोकांनी आपला जीव गमावला आहे. इगतपुरीच्या वाडीवऱ्हे परिसरात हा अपघात घडला आहे. मुंबई - आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) ही भीषण घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडेच खळबळ माजली आहे. मंगळवारी रात्री 9 वाजता हा अपघात घडला. मुंबई - आग्रा महामार्गावर सह्याद्रीनगरसमोर झालेल्या या अपघातात बोरटेंभे येथील तीन युवक दुर्देवानं जागीच ठार झाले आहेत. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्ती सध्या इगतपुरी येथील एका ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. (Three People Dies in Two Wheelar and Carriage Accident Near Igatpuri maharashtra)
अपघाताचा संपुर्ण घटनाक्रम
मुंबई - आग्रा महामार्गावर पंढरपुरवाडी (Pandharpurwadi) भागात घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे (Ghatndevi) टांग्याला आणि एका मोटार सायकलला एका भरधाव गाडीनं जोरदार धडक दिली. यावेळी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी अपघातग्रस्तांना रूग्णालयात नेले. समोर आलेल्या माहितीनुसार ही एक आयशर गाडी होती. या गाडीचा चालक फरार असून इगतपुरीचे पोलिस (Police) त्याचा शोध घेत आहेत. प्रभाकर सुधाकर आडोळे, कुशल सुधाकर आडोळे व रोहित भगीरथ आडोळे अशी तीन मृत व्यक्तींची नावं आहेत.
नाशिक शहरात गुन्हेगारेही सावट
नाशिक शहरात पुन्हा टोळक्यांचा हैदोस पाहायला मिळाला आहे. सिडको परिसरात टोळक्याने क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास राणा प्रताप चौकात चार ते पाच जण आले होते या ठिकाणी उभे असलेल्या दोन मुलांसोबत या संशयितांनी बाचाबाची केली यानंतर जवळ असलेल्या लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. या मारहाणीत हे दोघेजण किरकोळ जखमी झाली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे सिडको परिसरातील नागरिक दहशतीखाली असून या गावगुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यापुर्वीही घडले अपघात
नाशिकमध्ये यापुर्वीही अशीच एक घटना घडली होती. नाशिक - मुंबई महामार्गावर गोंदेजवळ पोलिस वाहनाला अपघात झाला होता. नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक मुंबई हायकोर्टात जात असताना ही घटना घडली. यावेळी पोलिसांचे बलेरो वाहन उलटले होते सुदैवानं यातील पोलिस कर्मचारी बचावले आहेत. ही घटनाही रात्री उशिरा घडली होती. मुंबई आग्रा महामार्गावर सकाळीही असाच एक अपघात घडला आहे. नाशिकहून मुंबईकडे जाताना ही घटना घडली.