Shirdi News : दुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है! KGF चित्रपटातील हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय आहे. हा डॉयलॉगला खरा ठरवणारी घटान शिर्डी मध्ये घडली आहे. आईच्या शक्तीपुढे बिबट्याने हार मानली. इतकंच नाही तर हातातील शिकार सोडून बिबट्याने धूम ठोकली  आहे. आपल्या पिलाचा जीव वाचवणाऱ्या थेट बिबट्याशी लढणाऱ्या श्वानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीतील राहात्यात बिबट्याची दहशत पहायला मिळतेय. राहाताच्या वैजापूर वस्तीमध्ये एका बिबट्यानं एका घराबाहेरून कुत्र्याचं पिल्लू पकडलं. मात्र, कुत्र्यानं पिल्लासाठी जोरदार प्रतिकार केल्याने बिबट्यानं पिल्लाला सोडून धूम ठोकली. सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये ही घटना चित्रीत झाली आहे.


साताऱ्याच्या सासपडे गावात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. कृषी सेवा केंद्राच्या सीसीटीव्हीत हा बिबट्या चित्रीत झाला आहे. या बिबट्याने गेल्या पंधरा दिवसात दहाहून अधिक कुत्र्यांचा फडशा पाडलाय. दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 


महाबळेश्वरमध्ये बिबट्याचे दर्शन


सह्याद्रीच्या पर्वतरांगामधिल महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असताना पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अवाढव्य बिबट्याचे दर्शन झाले. हे दृष्य आहे महाबळेश्वर - तापोळा रोडवरील.... महाबळेश्वरातून तापोळ्याला निघालेल्या पर्यटकांना या बिबट्याचे दर्शन झाले.... या रस्त्याच् दुतर्फा मोठ्या प्रमाणात जंगल असून या परिसरात सर्वच प्रकारचे प्रणी कायमच नजरेस पडतात. हे प्राणी जरी काही करत नसलेतरी सावधता बाळगण्याबाबतचे आवाहन वानविभागाकडून करण्यात आले आहे.


धुळे शहरालगत महिंदळे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे, परंतु वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची शोध मोहीम अथवा पिंजरे लावण्यात आल्या नसल्याने नागरिकांनी वनविभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. मुक्त संचार असलेल्या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वारं झालेल्या बिबट्याचा व्हिडिओ नेमका कुठल्या भागातला हे अद्याप स्पष्ट देखील झाले नाही. या परिसरात मातोश्री वृद्धाश्रम, संत आसारामजी आश्रम यासह नकाने तलाव असल्याने पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने ये जा करत असतात. परंतु कुठल्याही प्रकारची वनविभागाने आतापर्यंत शोध मोहीम हात घेतली नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. वन विभागाने मात्र या भागात बिबट्याच्या संचारबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.