वाशिम :  भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांच्या कारवर हल्ला झाला आहे. याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. त्यांनी आरोप लावला आहे की, शिवसेनेच्या गुंडांनी हा हल्ला केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमैया यांनी ट्वीट करून सांगितले की, दुपारी 12.30 मिनिटांनी कार वाशिम मधून जात होती. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर तीन मोठे दगड फेकले. जे खिडकीच्या काचाला लागले. यावेळी गाडीत मी आमदार राजेंद्र पटानी, तेजराव थोराट आणि सीआयएसएफचे जवान होते.


पोलिसांनी शिवसैनिकांना पांगवले
किरीट सोमैया यांनी आरोप लावला की, शिवसेनेच्या लोकांना माहित होते की माझ्या गाडीचा ताफा येथून जाणार आहे. त्यामुळे ते लोक आधीच रस्त्यावर उभे होते. त्यांनी कार वर शाई आणि दगड फेकले. दरम्यान पोलिसांनी हलक्या स्वरूपात बळाचा वापर करीत शिवसैनिकांना तेथून पांगवले.



किरीट सोमैया यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले की बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला. त्याची माहिती घेण्यास ते वाशिम जिल्ह्यात आले होते. दरम्यान त्यांच्या कारवर हल्ला झाला.