चंद्रपूर : Tiger and Dog Fight in Chandrapur : चंद्रपूरच्या जंगलात अनोखा थरार बघायला मिळाला. जंगलात जुनाबाई वाघिणीचा दरारा पाहाला मिळाला. जंगली कुत्र्यांनी या वाघिणीचा पाटलाग करत तिची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 कुत्र्यांच्या टोळक्यानं जुनाबाईला सुरुवातीला हैराण केलं. नंतर मात्र जुनाबाई या रानकुत्र्यांवर धावून आली आणि रान कुत्र्यांनी पळ काढला.. जंगलातल्या शिकारीची ही दुर्मीळ दृश्य वन्यजीवप्रेमी शैलेंद्र भोयर यांनी कॅमेऱ्यात चित्रित केली आहे.


 जुनाबाई वाघिणीचा पिच्छा करणाऱ्या रानकुत्र्यांची झाली पळता भुई थोडी, अत्यंत चपळ आणि दुर्मिळ असलेल्या रानकुत्र्यांनी वाघिणीचे लक्ष विचलित करुन तिची शिकार पळविण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून वाघिणीला भंडावून सोडण्यासाठी रानकुत्रे सरसावले होते.


मात्र रानकुत्र्यांवर चाल करुन पुढे आलेल्या वाघिणीला बघताच घाबरलेल्या कुत्र्यांच्या आकांताने जंगल एकदम भेसूर झाले. 20 कुत्र्यांच्या कळपाने वाघिणीला घेरण्याचा प्रयत्न फसला. जुनाबाई दमदार पावले टाकत पुढे आल्यावर पाणवठा सोडून रानकुत्रे पळाले.



आजवर कधीही कॅमेऱ्यात कैद न झालेले दृश्य चंद्रपूरचे वन्यजीवप्रेमी शैलेंद्र भोयर यांनी अनुभवले. आपल्या शत्रूला योजनाबद्ध पद्धतीने नामोहरम करण्यासाठी प्रसिद्ध असलेली रानकुत्री जुनाबाईच्या ठाम पवित्र्यांनी जंगलात झाली दिसेनाशी, अखेर वाघ जंगलाचा राजाच असतो या प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.