अमर काणे / नागपूर : राज्यात वाघांचे मृत्यूसत्र सुरुच आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नागलवाडी परिक्षेत्राच्या रिसाला रेंजंध्ये एका वाघाचा मृतदेह (Tiger death) संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. या वाघाचे चारही पंजे कापलेले होते. त्यामुळे या वाघाची शिकार झाल्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. वन संवर्धन व संरक्षणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


13 वाघांच्या मृत्यूची नोंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिसाला वन परिक्षेत्रात कक्ष क्रमांक 707 मध्ये वनरक्षकाला वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.त्याच्या अंगावरील सर्व केस गळून गेले आहे.पूर्ण वाढलेल्या या वाघाचा मृत्यू सुमारे आठवडाभरापूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. गेल्या तीन महिन्यांत राज्यात तब्बल 13 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान दुसऱ्या घटनेत वणी तालुक्यातील घोन्सा गावाजवळ एकावाघिणीचा गळ्यात तारांचा फास अडकून मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे


एका वाघिणीचा मृतदेह आढळला


नागलवाडी परिक्षेत्राच्या रिसाला रेंजंध्ये वाघाची शिकार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्ण वाढलेल्या या वाघाचा मृत्यू सुमारे आठवडाभरापूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारीच यवतमाळच्या वणी तालुक्यात घोन्सा शेत शिवारामध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता.गळ्यात तारांचा फास अडकल्याने या वाघीणीचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन महिन्यांत राज्यात तब्बल 13 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे वन संवर्धन व संरक्षणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.


वणी येथे मृतावस्थेत सापडलेल्यावाघिणीचे वय अंदाजे चार वर्ष आहे. बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस घोन्सा ते सोनेगाव पांदण रस्त्यावर असलेल्या एका नाल्यात ही वाघीण मृतावस्थेत पडून असल्याचे आढळले. यानंतर या घटनेची माहिती घोन्सा परिसरात समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. यासंदर्भात वनविभागालाही माहिती देण्यात आली त्यानंतर वनविभागाचे पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाघांचा संचार आहे. शेतकरी दहशतीखाली आहेत. दरम्यान, वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झालेले नाही.