ताडोबात पट्टेदार वाघ आणि वाघिणीला पाणी टंचाईची झळ
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील बफर क्षेत्रात मोठ्या संख्येने पट्टेदार वाघ आणि वाघिणीचा वावर आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु असून पाणी टंचाईची झळ मानवासह वन्यप्राण्यांनाही बसू लागली.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील बफर क्षेत्रात मोठ्या संख्येने पट्टेदार वाघ आणि वाघिणीचा वावर आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु असून पाणी टंचाईची झळ मानवासह वन्यप्राण्यांनाही बसू लागली.
पाण्याच्या शोधात चिमूर तालुक्यातील मदनापूर कोलारा या बफर झोनमधील एका पाणवठ्यावर वाघीण व तिचे ३ बछडे आपली तहान भागवताना कॅमेरात बंदिस्त झालंय. वन्यजीव प्रेमी रवींद्र मारपका यांनी हे वनजीवन टीपलंय.