नाशिक : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात युसूफ मेमनने अखेरचा श्वास घेतला. टायगर मेमनचे दोन्ही भाऊ युसूफ मेमन आणि इसाक मेमन नाशिक कारागृहात शिक्षा बंदी होते. हृदयविकाराच्या झटक्याचा उपचार घेत असताना युसूफचा मृत्यू झाला. नाशिकच्या कारागृहात असल्याने युसूफचं शव विच्छेदन धुळे शासकीय महाविद्यालयात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी युसूफला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण आजारपणामुळे युसूफला काही काळासाठी जेलबाहेर ठेवण्यात आलं होतं. आजारपणामुळे युसूफला जामिन मिळाला होता, पण या काळात युसूफ रुग्णालयातच राहिल, अशी अट ठेवण्यात आली होती. 


मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला याआधीच फाशी झाली आहे. तर मुंबई बॉम्बस्फोटाचे मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अजूनही फरार आहेत.