गडचिरोली : राज्यात वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील चपराळा अभयारण्यात स्थलांतरीत करण्यात आलेली वाघीण मृतावस्थेत आढळली आहे. त्यामुळे येथील वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. चपराळा जंगलातील मारोडा-जामगिरी येथे हा मृतदेह आढळला. 


या वाघीणीचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. छोट्या वन्यजीवांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात ही वाघीण अडकल्याचा अंदाज आहे. वाघिणीसह रानडुकराचाही मृतदेह आढळला. वनाधिकारी घटनास्थळी पोहचले असून तपास करीत आहेत.