TikTok Star Suraj Chavan on Santosh Munde : टिकटॉक स्टार संतोष मुंडेचं शॉक लागून मंगळवारी निधन झालं.  संतोषच्या निधनाची 'शॉकिंग' बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी सोशल माध्यमांवर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. (Santosh Munde passed away) संतोषचा मित्र सुरज चव्हाण दोघेही सर्वांना माहित आहेत. या अवलियांचे रील्स चांगलेच व्हायरल होतात. मनोरंजन म्हणून दोघांनाही चांगली पसंती आहे. सुरज मुळचा बारामतीचा आणि संतोष बीडचा, दोघांचे एकत्रित अनेक रील्स आहेत. संतोषच्या अशा अकाली जाण्याने सुरजलाही धक्का बसला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नमस्कार भावांनो, आज दु:ख झालं आहे, संतोष भावा तुला मी मिस करत आहे. लोक गेल्यावरच खांद्यावर आधी कोणी येत नाही, असं सुरज चव्हाणने एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच सुरजने संतोषसोबतचे काही रील्स शेअर केले आहेत.


सुरज चव्हाणने त्यांच्या इन्स्टावर दोघांचे रील्स टाकलेत. भावपूर्ण श्रद्धांजली वाघा, आता परत कधी येशील, असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दोघांचीही दोस्ती सर्वांना माहित होते. इतर टिकटॉक स्टार्ससारखा संतोष काही मॉडेल किंवा डान्सर असा काही नव्हता. संतोषचे रील्स पाहिले तर त्यामध्ये ग्रामीण भाषा, सहज विनोद व देहबोलीचा कलात्मक वापर करून त्याने प्रसिद्धी मिळवली होती.


 




 


संतोषचे इन्स्टावर दीड लाखांच्यावर फॉलोवर्स आहेत. यातील काही व्हिडीओला मिलियन्समध्ये व्हूज आले आहेत. संतोषचा मित्र सुरज चव्हाणला सहा लाखांच्यावर फॉलोवर्स आहेत. बाहेर गेल्यावर अनेक ठिकाणी संतोष मुंडेचा सत्कार केला जात होता.