नागपूर :  राजस्थानमध्ये अडकलेल्या सर्व महाराष्ट्रातील १ हजार ८०० विद्यार्थांना ३ मेपर्यंत महाराष्ट्रात आणले जाईल. असे आज राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्यातील  सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांकडून त्या-त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन झाली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान सरकारला पत्र लिहून आणि केंद्र सरकारची परवानगी घेवून पुढील दोन दिवसात. या महाराष्ट्रातील  १ हजार ८०० विद्यार्थ्यांना परत आणण्याच काम सुरु होईल. कोणत्याही परिस्थिती पुढच्या ३ तारखेच्या आत महाराष्ट्रातील कोटा येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी  महाराष्ट्रात पोहोचतील. असा विश्वास त्यांनी विद्यार्थांच्या पालकांना त्याचप्रमाणे विद्यार्थांना दिला आहे. 


सरकार म्हणून आम्ही आमचे काम करतोय. तिथे  विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे पालकांनी निर्धास्त रहावे. असं देखील ते म्हणाले. राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणानिमित्त असलेले १८०० विद्यार्थी अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विविध पातळीवरून मागणी होत आहे. ही बाब ध्यानात घेऊन सरकारने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.