TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल `इतक्या` पगाराची नोकरी
TMC Recruitment: ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत.
Thane Municipality Job: ठाणे महानगरपालिकेअंतर्गत काही दिवसांपुर्वी ज्युनिअर रेसिडन्स पदांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 1 महिला आणि 5 पुरूष जलनिर्देशक/जलजिवरक्षक पदे भरली जातील. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज पाठविणे आवश्यत आहे.
ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची असेल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने 6 महिन्याकरिता काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्याचे काम बघून किंवा तेथील कामाची गरज ओळखून हा कालावधी वाढवायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या निर्णयाचे उमेदवारांना पालन करावे लागेल.
BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार
या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना 14 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करताना बंद लिफाफ्यावर 'जलनिर्देशक/ जलजिवरक्षक म्हणुन नेमणुक करणेकरिता' असे ठळक अक्षरात नमूद करावे.
Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
उमेदवारांनी आपले अर्ज नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे. या पत्त्यावर पाठवायचे आहेत. दिलेल्या मुदतीनंतर आणि चुकीच्या पद्धतीने पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
ठाणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये 'शिका आणि कमवा'
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे. या पदाच्या तब्बल 647 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदवीधर अप्रेंटिसच्या एकूण 186 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित इंजिनीअरिंग ब्रांचमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार इतका पगार दिला जाणार आहे.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे काम करावे लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. 23 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.