राणेंनंतर रिक्त आमदारकीच्या जागेवर आज निवडणूक
राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज या जागेसाठी निवडणूक होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज या जागेसाठी निवडणूक होणार आहे.
सेनेची टोकाची भूमिका
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार का यावडून या निवडणूकीत रंगत आली.
मात्र शिवसेनेच्या टोकाच्या विरोधामुळे भाजपनं प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली.
आमदारांची बैठक
त्यानंतर काँग्रेसनं माजी आमदार दिलीप माने यांना रिंगणात उतरवलं आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसंच येणाऱ्या हिवाळी अधिवेसनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या आमदारांची बैठक होणार आहे..