Gold Silver rate Today on 9 January 2024 : सध्या लगनसराईचा हंगाम सुरु असून अशा स्थितीत सोने-चांदी खरेदीची लगबग देखील सुरु असते. जर तुम्हाला ही सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हीही तयारी लागा. कारण0 आज म्हणजेच 9 जानेवारीला 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. तर त्यासोबतच चांदीच्या किमतीतही मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


सोने चांदीचा आजचा भाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने आणि चांदीने दराबाबत ग्राहकांना दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने चांदीच्या दरात दरवाढ झाली होती. तर 3 जानेवारीपासून मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र सुरू झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला या दोन्ही धातूमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. सोने चांदीच्या दरातील चढउतार पाहता ग्राहकांनी खरेदीची लगबग सुरु केली. दरम्यान आज सोने 1100 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 


हे सुद्धा वाचा : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर


डिसेंबर 2023 महिन्यात सोने 66 हजारांच्या घरात पोहोचले होते . 3 जानेवारी रोजी सोन्याचे भाव घसरले. 4 जानेवारी रोजी सोने 440 रुपयांनी घसरले. 5 जानेवारीला सोन्याचा दर 130 रुपयांनी घसरला. 6 जानेवारीला  20 रुपयांनी वाढ झाली होती.  तर सोमवार, 8 जानेवारीला 220 रुपयांनी किंमती उतरल्या होत्या. GoodReturns या वेबसाईटनुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.


चांदीचे दर चकाकले


गेल्या वर्षी चांदी महागली होती. तर 3 जानेवारीला चांदी 300 रुपयांनी घसरली. 4 जानेवारी रोजी 2000 रुपयांनी कमी झाली. 8 जानेवारीला 200 रुपयांनी घसरली. GoodReturns च्या वेबसाईटनुसार एक किलो चांदीची किंमत 76,400 रुपये आहे.


14 ते 24 कॅरेटची किंमत


इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,192 रुपये, 23 कॅरेट सोन्याची किंमत 61,943 रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत 56968 रुपये आहे. 18 कॅरेट सोने 46,644 रुपये, 14 कॅरेट सोने 36,382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले. एक किलो चांदीचा भाव 71,386 रुपये होता. फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या क्रूसिबलवर कोणताही कर किंवा शुल्क नाही. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश केल्यामुळे किमतीत तफावत दिसून येत आहे.


हॉलमार्क केलेले कॅरेट


भारतीय मानक संस्थेकडून शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यान 999, 23 कॅरेट 95, 22 कॅरेट 916, 21 कॅरेट 857 आणि 18 कॅरेट 750 आहे. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची मागणी करतात.काही लोक 18 कॅरेट सोने वापरतात.तर 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोने आणि 9% इतर धातू आहेत.  यामध्ये तांबे, चांदी आणि जस्त वापरून सोने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने मजबूत आहे.