रत्नागिरी - सिंधुदुर्ग : कोकणात शिमग्याचा माहोल साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्याचे आयोजन केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदार संघात निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे हे दोन आमदार आहेत. या दोन्ही तरुण आमदारांनी कोकणात राष्ट्रवादीचे खाते खोलले. 


अदिती तटकरे आणि शेखर नाईकम यांचा अपवाद वगळता कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणात पक्ष बांधणीवर भर देण्याचे ठरवले आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांचं खेडमध्ये आगमन झालं. यावेळी अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक सुरु होण्यापुर्वी अजित पवार यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांची हजेरी घेतली.



कोणता अधिकारी बैठकीला हजर राहीला नाही याची हजेरी घेत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. तर, शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असून तेथेही ते पक्ष संघटनात्मक बांधणी करणार आहेत.