मुंबई :  राज्यासाठी चिंताजनक बातमी आहे.  राज्याचा कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) दररोज वाढ होतेय. दिवसभरात राज्यात एकूण  9  हजार 771 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या वाढत्या कोरोना बाधितांच्या आकड्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (today June 30 2021 9 thousand 771 corona cases have been reported in Maharashtra)  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये  10 हजार 353 कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 58 लाख 19 हजार 901 जण कोरोना मुक्त झाले आहेत.  त्यामुळे राज्यामधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे (Recovery Rate) 96.02 इतके झाले आहे.  तर दिवसभरात एकूण 141 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर  2.01 % इतका झाला आहे. 


मुंबईतील  रुग्णसंख्या


मुंबईत 24 तासांमध्ये 692 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 6 लाख 96 हजार 105 जण बरे झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 % टक्के इतका झाला आहे. मुंबईत ताज्या आकडेवारीनुसार एकूण 8 हजार 351 सक्रीय रुग्ण आहेत. 



मुंबईत 1 जुलैला  लसीकरण बंद


पुरेशा लस साठ्याअभावी उद्या (1 जुलै) मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 


संबंधित बातम्या : 


राज्यात कोरोना बळींच्या आकडेवारीत प्रचंड घोळ! हजारो मृत्यू कुणी आणि का लपवले?


राज्यात लसीचा तुटवडा, अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक