Today Petrol Diesel Price on 22 January 2024 : अयोध्येत राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश 'राममय' झाले आहेत. तर दुसरीकडे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेल जारी केले जातात. 2017 पूर्वी दर पंधरा दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी करण्यात येत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरानुसार आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 77.38 डॉलरवर व्यवहार करत आहे. सध्या WTI कच्चे तेल प्रति बॅरल $72.98 या दराने विकले जात आहे. त्याचा परिणाम देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित बदल झाल्याचे दिसत आहे.


पाहा महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर


मुंबईत आज पेट्रोल 106.31 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये/प्रति लिटर 
पुण्यात पेट्रोल 105.95 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
ठाण्यात पेट्रोल 105.82 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 93.28 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.14 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
छत्रपती संभाजी नगर पेट्रोल 106.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर 


SMS द्वारे दर जाणून घ्या आजचे दर


तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तुम्ही SMS द्वारे देखील मिळवू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात किंवा HPCL ग्राहक 9222201122 किंवा नंबरवर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर किंवा नंबरवर पाठवू शकतात. अशाप्रकारे तुम्हाला घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर समजतील.