पुणे: जिल्ह्यातील जुन ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी बिनविरोध झालेल्या १२ ग्रामपंचायती वगळता उर्वरित ७६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. तर, उद्या मतमोजनी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायती पैकी १२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या तसेच सदस्य पदाच्या ८३४ जागांपैकी २६८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर एकही अर्ज न दाखल झाल्याने सरपंच पदाच्या २ आणि सदस्य पदाच्या ७८ जागा रिक्त राहिल्या आहेत.


ओळखपत्रासह मतदानाच हक्क बजवा - निवडणूक आयोग


दरम्यान,  उर्वरित ७६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मतदान होत आहे. यामध्ये सरपंच पदासाठी २२६ आणि ग्रामपंचायत सदस्य पदाच्या ४८८ जागांसाठी ११६० उमदेवार निवडणुक रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत. संबंधित ग्रामपंचायती क्षेत्रातील ग्रामस्थांनी निवडणुक आयोगाने निर्धारीत केलेल्या ओळखपत्रासह आपला मतदानाच हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. 
प्रशासनाच्या वतीने निवडणुक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून सर्व साहित्यासह मतदान केंद्रावर पाठविण्यात आले आहे.


जनतेचा कौल कुणाला?


लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या विविध नागरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये अनपेक्षीत कौल पहायला मिळाले आहेत. त्यामुळे या वेळी ग्रामपंचात निवडणुकांमध्ये जनतेचा कौल काय असणार याबाबत उत्सुकता आहे.