टोलवाढीसंदर्भातील मनसेचे उपोषण मागे पण राज ठाकरे आक्रमक, काय निर्णय घेतला? जाणून घ्या
Raj Thacjeray On Toll Hike Issue: टोल नाक्यावरुन गाड्या किती जातात, टोल किती जमा होतोय आणि टोलचं काय होतंय? हे समजायला हवे. टोल भरुनही रस्त्यांची दुरावस्था असेल मग टोलच्या पैशांचं काय होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Toll Hike Issue: टोल संदर्भातील प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदे यांनी मागे का घेतलं? त्यांना असं करण्यास कोणी सांगितलं का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.ठाण्यात टोल दरवाढी विरोधात मनसेने आंदोलन केले. या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधला. टोलमुक्त महाराष्ट्र कधी होणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
टोल नाक्यावरुन गाड्या किती जातात, टोल किती जमा होतोय आणि टोलचं काय होतंय? हे समजायला हवे. टोल भरुनही रस्त्यांची दुरावस्था असेल मग टोलच्या पैशांचं काय होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. टोल संदर्भात अविनाश जाधव यांचं उपोषण मागे घ्यायला लावले, असेही ते म्हणाले. रस्ते चांगले केले तर कामे निघत नाहीत,असेही ते म्हणाले.
मी 2 दिवसात टोलवाढीप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर भूमिका मांडेन असे त्यांनी सांगितले.