नाशिक : टोमॅटोचे दर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नाशिक बाजार समितीत टोमॅटोला प्रति किलो पाच ते दहा रुपये इतका दर मिळतोय. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यामुळं टोमॅटोचे दर घसरले आहेत. 


नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, कळवण, चांदवड आणि निफाड या तालुक्यात टोमॅटोची लागवड केली जाते. यंदाही चांगला दर मिळेल, या आशेनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली.


मात्र, आवक वाढल्यामुळं टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. टोमॅटोच्या लागवडीला एकरी पावणे दोन लाख रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर सध्याचा दरामुळं शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भागत नाही... त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्टपणे दिसून येतेय.