टोमॅटोचे दर घसरल्यामुळं शेतकऱ्यांनी दिले फेकून
टोमॅटोचे दर प्रति किलो दोन ते तीन रुपयांवर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
नाशिक : टोमॅटोचे दर प्रति किलो दोन ते तीन रुपयांवर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
सध्या बाजारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळं दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतक-यांची मोठी अडचण झाली आहे.
टोमॅटो उत्पादन आणि निर्यातीमध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर असून शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतमालाच्या लागवड खर्चाच्या दिड पट हमीभाव देण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं असताना भावाअभावी टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आलीय.