महाबळेश्वर : ख्रिसमस आणि सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक या पर्यटननगरीत आलेत. महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या या थंड हवेच्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.


पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक, केटस् पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, लॅडवीक, विल्सन आणि मुंबई पॉईंट यासह लिंगमळा धबधबा ही ठिकाणं गर्दीने फुलली आहेत. 


वेण्णालेकमध्ये पर्यटकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. मुख्य बाजारपेठा सजल्या असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक खरेदीसाठी येतात.


पालिकेकडून पार्किंगची सोय करण्यात आली असली तरी वेण्णालेकसह काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागतोय.



सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललं