उमेश परब, झी मीडिया, मालवण: आपण सर्वच जण मालवणमध्ये फिरायला जातो. मालवणला (Malvan News) जायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. मालवण-कोकणचा निसर्ग आपण सगळेच पसंद करतो. त्यामुळे शनिवार - रविवार किंवा कुठल्याही ठिकाणी खासकरून निसर्गरम्य परिसरात आपण अशा ठिकाणी आवर्जून भेट देतो. परंतु सध्या अशीच एक बातमी सगळीकडे जोरानं व्हायरल (Viral) होते आहे. मालवण भागात अशाच एका पर्यटकांचा (Travel) अतिउत्साह नडला आहे. आपली गाडी ते थेट सागरकिनाऱ्यावर घेऊन जात होते. त्यामुळे जवळपास त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकला असता. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (tourist got stuck with a car in malvan beach tracker helps them to escape)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालवणात पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट आलाआहे. मालवणात आलेल्या पर्यटकांनी काल सायंकाळी अतिउत्साहीपणा दाखवत आपली कार थेट किनाऱ्यावर समुद्रालगत नेली. ही कार नंतर वाळूत रुतली. अनेक प्रयत्न करून कार बाहेर येईना.अखेर ट्रॅक्टर (Trackter) बोलवून वाळूत फसलेली कार बाहेर काढण्यात आली. मालवणात येणाऱ्या पर्यटकांचा अतिउत्साहीपणा कित्येकदा त्यांच्या अंगलट येत असतो.पण पर्यटक बोध घेताना दिसत नाहीत. हे पुन्हा अधोरेखित झालं.


गाडीचा व्हिडीओ व्हायरल : 


या व्हायरल होणाऱ्या व्हि़डीओत तुम्ही पाहू शकता की गाडी अशी मध्येच पाण्यात अडकली आहे. आणि त्यामुळे ही गाडी बाहेर काढणंही लोकांसाठी मुश्किल झालं. या पर्यटकांची गाडी अशी मध्येच वाळूमध्ये अडकलेली दिसली आणि त्यामुळे त्यांना ती गाडी बाहेर (Car Stuck in Beach) काढताना बऱ्याच अडचणीही येत होत्या. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल आहे. गाडी अनेक प्रयत्न करूनही बाहेर येत नव्हती. शेवटी एक छोटासा ट्रॅक्टर मागून ती बाहेर काढावी लागली.