राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 3 जण बेशुद्ध, 35 जण जखमी
पुण्यातल्या राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. 30 ते 35 जणांना मधमाशा चावल्या.
honey bee attack : पुण्याजवळीत भोर येथे असलेलल्या राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. 30 ते 35 जणांना मधमाशांनी चावा घेतला. यापैकी तिन पर्यटक बेशुद्ध अवस्थेत होते. जखमींवर वेल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे.
काय झाल नेमकं?
राजगड किल्ल्यावर सुवेळा माची परिसरात पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. 30ते 35 जणांना मधमाशांनी चावा घेतला. यात चार पर्यटक माशा चावल्याने बेशुद्ध पडले होते. जखमींवर वेल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पर्यटकांनी मारलेल्या सुगंधित परफ्युममुळे मधमाशांचे पोळ उठलं
एका अति उत्साही पर्यटकांनी मारलेल्या सुगंधित परफ्युममुळे मधमाशांचे पोळ उठलं. अचानक मधमाशांच्या टोळक्याने हल्ला केल्याने पर्यटक गोंधळले. पर्यटकांची पळापळ झाली. किल्ल्यावरील इतर पर्यटकांनाही माशा चावल्या आहेत. यात माशा चावून जखमींची संख्या वाढण्याची ही शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रविार सुट्टी असल्याने अनेक पर्यटक राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते.
अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला
भंडा-यातील पवनीमध्ये अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांचा हल्ला होताच लोकांनी स्मशानभूमीतच प्रेत ठेवून सैरावैरा पळत निघाले. यात जवळपास 25-30 जण जखमी झालेत. त्यातील 5 जखमींना ग्रामीण रुग्णालय पवनी इथं उपचारार्थ दाखल केलंय.
गणपती विसर्जासाठी आलेल्या 100 जणांवर मधमाशांचा हल्ला
भोर तालुक्यात गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला होता. हिर्डोशी गावात नीरा देवधर धरणाच्या काठावर गणपती विसर्जनासाठी नागरिक आले होते. आरती करत असताना अचानक मधमाशांना ग्रामस्थांवर हल्ला चढवला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. अखेर विसर्जन न करताच ग्रामस्थांवर तिथून निघून जाण्याची वेळ ओढवली. मधमाशा गेल्यानंतर मग काही ग्रामस्थांनी काठावर जात विसर्जन पार पाडलं.