कोकणात पर्यटकांची संख्या वाढली, व्यवसायिकही सुखावले
कोकणचे किनारे आता हळूहळू पर्यटकांनी फुलू लागले आहेत.
प्रफुल्ल पवार झी मीडिया, रायगड : कोकणचे किनारे आता हळूहळू पर्यटकांनी फुलू लागले आहेत. लांबलेला पाऊस आणि त्यानंतर सुरु झालेली चक्रिवादळांची मालिका यामुळे थंडावलेला पर्यटन उत्सव जोर धरु लागल्यानं व्यवसायिकही सुखावले आहेत. पर्यटकांचा हा ओघ आता नवीन वर्षापर्यंत आसाच कायम राहणार आहे.
रायगडच्या अलिबाग, काशिद , मुरूड , दिवेआगर , हरिहरेश्वरचे किनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची अशी धम्माल सुरु आहे. ((शॉट्स)) केवळ समुद्र किनारेच नव्हे तर इथल्या किल्ल्यांकडेही पर्यटकांनी पावलं वळू लागलीत..
खरतंर दिवाळीनंतरच इथं पर्यटन महोत्सव सुरु होतो. मात्र आधी लांबलेला पाऊस आणि त्यानंतर सुरु झालेली वादळांची मालिका यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे व्यवसायीक धास्तावले होते. मात्र डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागली. त्यामुळे व्यवसायीकही सुखावले आहेत.