प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर : कोरोनामुळं (Corona) गेल्या 2 वर्षांपासून अर्थव्यवस्थेची (Economy) सगळी गणितं बदलून गेली आहेत. कोरोनामुळे अनेकांची काम गेली. बेरोजगारीची कुऱ्हाड पडली. याचा थेट परिणाम हा अर्थव्यवस्थेवरही झाला. मात्र भारतातील कृषी क्षेत्रानं (Agriculture Sector) आपली पाळंमुळं घट्ट ठेवलीत. त्यामुळंच की काय, ट्रॅक्टरला (Tractor) सध्या अच्छे दिन आले आहेत. (Tractor sales in India have increased by 40 per cent and in Maharashtra by 70 per cent)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेती आणि अन्य कामात ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या  ट्रॅक्टरच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे.  नेमकी किती टक्क्यांनी ही वाढ झालीये, हे आपण जाणून घेऊयात.


भारतातील ट्रॅकर उद्योगाला 'अच्छे दिन'


कोरोनामुळं सगळं जग ठप्प झालं. शहरांमध्ये लॉकडाऊन झालं. उद्योगधंदे बंद पडले. पण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मात्र आपल्या शिवारात काम करतच होता. भारताची अर्थव्यवस्था सावरण्याचं काम केलं ते कृषी क्षेत्रानं. त्यामुळंच या उद्योगासाठी लागणा-या ट्रॅक्टर विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. कोल्हापुरातील ट्रॅक्टर निर्मिती उद्योगालाही चांगले दिवस आलेत.



 ट्रॅक्टरची मागणी एवढी वाढली की, उत्पादकांनी लॉकडाऊनमध्ये घरी गेलेल्या कामगारांना चक्क विमानानं परत आणलं. एकाबाजूला कोरोनामुळं जगात मंदीची चित्र आहे. मात्र ट्रॅक्टर उद्योगाची चांदी झाली आहे. देशात ट्रॅक्टर विक्रीत 40 तर राज्यात 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


एका काळात ज्या वेळेला सगळे उद्योग धंदे सगळी सगळी मागणी ठप्प झाली.  त्यावेळेला गेल्या वर्ष दीड वर्षात शेती एकमेव उद्योग आणि एकमेव व्यापार भारताची अर्थव्यवस्था टिकून राहिली.  ट्रॅक्टर आणि कृषी उद्योग कृषीच्या रूपाने भले कितीही कोणीही आयटी क्षेत्रात प्रगती केली असली तरी,  ग्रामीण उद्योग व्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. 


त्यामुळे ट्रॅक्टर उद्योगांमध्ये न भूतो न भविष्यती तो 30 ते 40 टक्के जास्त मागणी आली या सर्वाचा पुरवठा कोल्हापूर जिल्ह्यामधील फाउंड्री उद्योग करत आहे. 


सगळ्या जगात मंदी असताना, ट्रॅक्टर उद्योगाला मात्र सुगीचे दिवस आलेत. ट्रॅक्टर म्हणजे आधुनिक शेतक-याचं प्रतिक. शेतीत काही खरं नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठीच चपराक आहे.