बातमी हळहळ व्यक्त करणारी, वाहतूक कोंडीने घेतला बालकाचा बळी
आता एक बातमी हळहळ व्यक्त करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्टची. अवघ्या तीन वर्षांच्या बालकाचा वेळेअभावी उपचार न झाल्यानं जीव गेला.
कोल्हापूर : आता एक बातमी हळहळ व्यक्त करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्टची. अवघ्या तीन वर्षांच्या बालकाचा वेळेअभावी उपचार न झाल्यानं मृत्यू पावलेल्या बापानं ही पोस्ट केलीय आणि वेळ का लागला याच कारण ही ऐकलं तर आपण खरंच संवेदनशील आहोत की नाही ह्याचा विचार करावाच लागेल. त्यांच्या तीन वर्षांच्या कार्तिकच्या घशात अडकलेल्या शेंगदाण्यामुळे त्याला श्वसनाचा त्रास होत होता. याच्यावर उपचारासाठी त्याला रुग्णवाहिकेने शहरातील दवाखान्यात आणताना ट्रॅफिकमुळे उशीर झाला आणि त्यामुळेच कार्तिकचा जीव गेला.
कार्तिकला वेळेत दवाखान्यात पोहोचला असता, तर तो नक्कीच वाचला असता असं डॉक्टरांचे म्हणणे आहे.अशाच प्रकारे ट्रॅफिकच्या कोंडीमुळे इतर रुग्णांना सुध्दा दवाखान्यात पोहोचायला वेळ होतो. त्यामुळे डॉक्टराच्यां उपचाराबरोबरच इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये समाजातील इतर घटकांनी यामध्ये तत्परता दाखवली पाहिजे असं मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.