मुंबई :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर (Mumbai-Pune Express Highway) झालेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. पाच तास उलटून गेल्यानंतरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा फटका जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनाही बसला आहे.  एकवीरा कार्ला गेट ते लोणावळ्यादरम्यान वाहनांची रांग लागली आहे. 


वाहतूक पोलीस आणि लोणावळा शहर पोलिसांची वाहतूक कोंडी सोडवताना चांगलीच दमछाक झाली आहे. विकेंड असल्याने अनेक जण लोणावळा, खंडाळ्यात फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. पण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडीत फसले आहेत. 


आज सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर केमिकलचा टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला. यामुळे एक्स्प्रेस-वे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.



अमृतांजन पुलाखाली मुंबईला येणारा केमिकलचा टँकर पलटी झाला. त्यामुळे दोन्ही लेन बंद करण्यात आले. आय.आर.बी यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलिसांचे मदत कार्य सुरू आहे.