ठाणे : काल झालेल्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या टॅंकर अपघातानंतर आता पुन्हा ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकांना अनेक तासांपासून अडकून बसावं लागलं आहे. 


कुठे झाली वाहतूक कोंडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायमुख पासून ते मुंबई अहमदाबादहायवे पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. अहमदाबाद हायवेवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावर जवळपास रात्री पासून १२ गाड्या बंद पड्ल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे समजते. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या आहेत. 


काल झाला होता अपघात


मुंबई अहमदाबाद हायवे वर घोडबंदर येथे गॅस टॅंकर उलटला होता. सुदैवाने या अपघातामध्ये गॅस लीक होत नसल्याने मोठे संकट टळले होते. पण यामुळेही वाहतूक कोंडी झाली होती. 


वाहतूक होती बंद


अपघातानंतर ठाण्यातील नागला रोडपासून मुंबईकडे येणारी वाहतुक बंद करण्यात आली होती. तसेच वाहनं वळवून मुलुंड किंवा भिवंडी मार्गे आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. घटनास्थळी मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच वाहनं चालवण्यास मनाई करण्यात आली होती.