मुंबई : Mumbai-Goa National Highway Traffic jam : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोडी पाहायला मिळत आहे. आज दुसरा शनिवार असल्याने सलग सुट्ट्यामुळे गावा जाण्याऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. रेल्वे तिकिटे मिळत नसल्याने रस्ता वाहतुकीला अनेकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. कोकण तसेच गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्याला दिसून येत आहे.  वाहतूक कोंडी सोडविताना पोलीस यंत्रणेची दमछाक होताना दिसत आहे. सलग सुट्या आणि वीकेंडमुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच  कडक ऊन आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.


दरम्यान, मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाका आणि बोरघाटात वाहतुक कोंडी झाली आहे. विकेंड तसेच अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे छोट्या वाहन चालकांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागत आहे. बोरघाटात अम्रृतांजन पुलापासून दोन्ही बाजुला 2-3किमीच्या रांगा लागल्या आहेत. अत्यंत धिम्या गतीने वाहनं पुढे सरकत आहेत. खडांळा लोणावळा दिशेनं आणि मुबंईच्या दिशेने वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. अम्रृतांजन पुलापासून दोन्ही बाजुला  2-3 किमी च्या रागां लागल्या असतानाच खडांळा लोणावळा दिशेने आणि मुबंई दिशेने 2-3 किमी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.