COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई : वसईमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला धक्काबुक्की करुन मारहाण करण्यात आली आहे. काळू विठ्ठल मुंडे असं या पोलिसाचं नाव आहे. सोमवारी ७ ऑगस्टला वसईच्या पार्वती क्रॉस परिसरात भर रस्त्यात ही घटना घडली आहे. 


या मारहाणीचा व्हिडीओ समोर आलाय. सोहेल मेनन असं या मारहाण करणा-या इसमाचं नाव आहे. सिग्नल तोडल्यावरुन सोहेलची वाहतूक पोलिसासोबत बाचाबाची झाली. 


यावेळी सोहेलनं पोलिसाच्या श्रीमुखात लगावली. एकदा नाही तर वारंवार तो पोलिसाला मारहाण करत होता. धक्कादायक म्हणजे भर चौकात गर्दी असतानाही, बघ्यांपैकी कुणीही पोलिसाच्या मदतीला धावून आलं नाही. 


माणिकपूर पोलिसांनी सुद्धा मारहाण करणाऱ्या इसमावर फक्त एनसी नोंदवली आहे. अद्याप मारहाण करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आलेली नाही.