Plane Crash : पायलट होण्याआधीच स्वप्नांचा चक्काचूर; विमान कोसळून प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू
Plane Crash In Madhya Pradesh : गोंदियातील बिरसी विमानतळावरून या प्रशिक्षणार्थी विमानाने उड्डाण केले. उड्डानानंतर या प्रशिक्षणार्थी विमानाला मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
Plane Crash In Madhya Pradesh : पायलट होण्याआधीच स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. विमान कोसळून पायलटसह प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh ) एक भयानक विमान दुर्घटना घडली आहे. या विमानाने महाराष्ट्रातील गोंदिया (Gondiya) येथील बिरसी विमानतळावरून उड्डाण केले. या विमान दुर्घटनेची (Plane Crash) चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिरसी विमानतळावर ही दुर्घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी विमान कोसळून पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाटमधील किरणापूर भागातील भुक्कूटोला येथे हा अपघात झाला. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गोंदियातील बिरसी विमानतळावरून या प्रशिक्षणार्थी विमानाने उड्डाण केले. उड्डानानंतर या प्रशिक्षणार्थी विमानाला मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
मृताचे नाव पायलट मोहित तर महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नाव वरसुका असे आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही विमान दुर्घटना घडली. असल्याचे सांगण्यात येत आहे. बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुक्कुटोला येथील घनदाट जंगलात हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. जवळ जवळ 100 फुट खोल दरीत विमानाचा मलबा सापडला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच बालाघाट पोलीस घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर विमान जळून खाक झाले होते. घटनास्थळी पोलिसांना एका पायलटचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.